मुंबई सवरेदय मंडळ आणि गांधी बुक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रदर्शनात ‘महात्मा गांधी यांचे विचार’ हे ६०८ पानांचे पुस्तक अवघ्या ६५ रुपयांमध्ये मिळणार आहे. गांधीजींसह विनोबा आणि सवरेदय विषयावरील विविध पुस्तके पन्नास टक्के सवलतीत मिळणार आहेत. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत हे पुस्तक प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हुतात्मा चौक, पोलीस चौकीजवळ येथे तर गांधी बुक सेंटर, नाना चौक येथे सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहे.
‘महात्मा गांधी यांचे विचार’ या पुस्तकाची मूळ किंमत १२५ रुपये असून ते ६५ रुपयांमध्ये मिळणार आहे. ‘नैतिक धर्म’ हे पुस्तक १५ रुपयात उपलब्ध आहे. महात्मा गांधी यांचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक अवघ्या २५ रुपयांमध्ये तर ‘सिलेक्टेड वर्क्‍स ऑफ महात्मा गांधी’ हा दीड हजार पाने असलेला पाच पुस्तकांचा संच अवघ्या ७५ रुपयांत मिळणार आहे.