एसटी महामंडळातर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध विभागातून एकूण ६१४ जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी या काळात एसटीने ५७२ गाडय़ा सोडल्या होत्या. या ६१४ गाडय़ांपैकी सर्वात जास्त १४७ गाडय़ा मुंबई आणि पुणे विभागातून सोडण्यात येतील. तर सर्वात कमी म्हणजे ३० गाडय़ा अमरावती विभागात चालवल्या जातील.
सहा विभागात मिळून ६१४ जादा बसगाडय़ा एसटी चालवणार आहे. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये रेल्वे गाडय़ांनाही प्रचंड प्रतिसाद मिळत असला, तरी रेल्वे गावागावांत जात नाही. त्यामुळे दुर्गम भागातील आपल्या गावाला जाण्यासाठी अनेक प्रवासी एसटीवरच अवलंबून असतात. या प्रवाशांसाठी एसटीने या जादा बसगाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या जादा गाडय़ांपैकी १४७ गाडय़ा मुंबई व पुणे विभागातून चालवल्या जातील. तर औरंगाबाद विभागातून १०७, नाशिक विभागातून १२४, अमरावती विभागातून ३० आणि नागपूर विभागातून ५९ जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या गाडय़ा प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन त्या ठिकाणी पाठवल्या जातील. तसेच या गाडय़ांची आरक्षणे व इतर माहितीबाबत जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा