हिंदी महासागरात दक्षिण गोलार्धामध्ये मादागास्कर बेटांच्या जवळून आधीच्या गोंडवाना महाखंडाचा निखळलेला भाग म्हणजेच इंडियन प्लेट; हळूहळू पुढे सरकत असताना ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी भूस्तराखाली सुरू असलेल्या हालचालींचा वेग वाढला आणि लाव्हारस उफाळून वर आला. हा महाप्रचंड ज्वालामुखी दीर्घकाळ सुरूच होता. शिवाय अनेक लहानमोठय़ा ज्वालामुखींना सुरुवात झाली. त्यातून इंडियन प्लेटच्या मध्य ते दक्षिण भागापर्यंत लाव्हारसाचे अनेक थर एकावर एक चढत गेले. त्यातून तयार झालेल्या जगातील सर्वात मोठय़ा ज्वालामुखीजन्य पाषाण पठारालाच आपण दख्खनचे पठार म्हणतो. तर भूगर्भतज्ज्ञ त्याला डेक्कन ट्रॅप म्हणतात. ट्रॅप म्हणजे पायऱ्या. लाव्हारसाचे एकावर एक चढत गेलेले हे थर आजही आपल्याला पाचगणीहून महाबळेश्वरला जाताना समोरच्या बाजूस पाहाता येतात. एवढेच नव्हे तर पायऱ्यांप्रमाणे असलेले हे ४२ थर चक्क मोजताही येतात. या महाज्वालामुखीतून निर्माण झालेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकचा काही भाग होय. यामध्ये महाराष्ट्रातील भागामध्ये मुंबईचा समावेश होतो. ही मुंबईच्या जन्माची कूळकथा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एखादी गोष्ट कुणीही सांगितली म्हणून ती आपण स्वीकारता कामा नये, त्याचे पुरावेही मागायला हवेत. मग मुंबईच्या या जन्माचे आणि तिच्या वयाचे पुरावे आहेत का आपल्याकडे? आज एकविसाव्या शतकात ते पाहता येतात का? किंवा ताडून पाहाता येतात का? या सर्वच प्रश्नांचे उत्तर होकारार्थी आहे. भूगर्भातील हालचालींच्या नोंदी दगडांमध्ये- खडकांमध्ये साठवल्या जातात, त्या भूचुंबकीय लहरींच्या रूपामध्ये. मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील खडकांची अशी भूचुंबकीय चाचणी झालेली असून त्यांचे वयोमान ६५ दशलक्ष वर्षे असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण ६५ दशलक्ष वर्षांपूर्वीचे हे पुरावे कुठे पाहायचे? तर, त्यासाठी मात्र आपल्याला मुंबई-ठाण्याच्या बरोब्बर मधोमध असलेल्या कान्हेरी लेणींच्या डोंगरावर जावे लागेल. सध्या कान्हेरी लेणींचे संकुल ज्या डोंगरावर आहे. त्याच डोंगरावर या मुंबईच्या निर्मितीस कारण ठरलेल्या अनेक ज्वालमुखींपैकी एकाचे मुख आहे. कान्हेरी लेणींच्या सर्वाधिक उंच टेकडीवर आपण उभे असतो तेव्हा कान्हेरी अस्तित्वात नसताना ६५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या मुखावरच आपण उभे असतो. तिथे उभे राहून बाजूचा परिसर व्यवस्थित न्याहाळला तर आपल्याला ज्वालामुखीतून उसळलेल्या व वेगात बाहेर फेकल्या गेलेल्या लाव्हारसामुळे तयार झालेला गोलाकार उंचवटा सर्व बाजूंनी ३६० अंशाच्या कोनात आजही व्यवस्थित पाहाता येतो. फरक इतकाच की, एवढय़ा वर्षांनंतर ऊनपाऊस आणि वाऱ्यामुळे त्याची बरीचशी झीज झाली आहे.

डॉ. रोहिंग्टन आवासिया किंवा डॉ. श्रीनिवास विळदकर यांच्यासारखे भूगर्भतज्ज्ञ सोबत असतील तर मग तत्कालीन ज्वालामुखीमधून बाहेर वातावरणात फेकले गेलेले आणि खाली येऊन भूतलावर आदळून फुटलेले व्होल्कॅनिक बॉम्बचे अवशेषही पाहाता येतात. ज्वालामुखीच्या पहिल्या टप्प्यात भूभागावरची माती आणि दगड हवेत फेकले जातात, त्यापासून तयार होतो तो ब्रेशिया. हा ब्रेशिया कान्हेरीसह अनेक ठिकाणी मुंबईत पाहायला मिळतो.

नंतरच्या टप्प्यात भूगर्भातून मोठाले दगड वातावरणात काही किलोमीटर्सवरती फेकले जातात. त्याच्या चहूबाजूंना लाव्हारस लगडलेला असतो. ते वातावरणातून काही किलोमीटर्स खाली परत येताना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांचा वेग प्रचंड वाढलेला असतो. खाली आल्यानंतर ते जमिनीवर प्रचंड वेगात आपटतात आणि स्फोट होऊन फुटतात, म्हणूनच त्यांना व्होल्कॅनिक बॉम्ब म्हणतात. हे ओळखण्यासाठी आपल्याला लहानपणी कागदाचे तुकडे करून वरून खाली सोडण्याचा केलेला प्रयोग आठवावा लागेल. ते कागदाचे तुकडे सरळ खाली न येता, गुरुत्व बलामुळेच ते गोलाकार भिरभरत खाली येतात. या व्होल्कॅनिक बॉम्बचेही तसेच होते. ते भिरभिरत खाली येताना त्यांना पीळ पडतो आणि खाली फुटतानाही तो पीळ कायमच असतो. असे पीळ असलेले व्होल्कॅनिक बॉम्ब आजही कान्हेरीच्या माथ्यावर मुबलक संख्येने आढळतात. फक्त त्यासाठी तशी शोधक नजर हवी, इतकेच.

डॉ. रोहिंग्टन आवासिया यांना मुंबईसंदर्भात संशोधन करताना असे लक्षात आले की, खास करून कान्हेरी परिसरामध्ये जिथे ज्वालामुखी झाला त्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा साठा असावा. म्हणजेच मोठा तलाव अस्तित्वात असावा. त्याचे पुरावेही अगदी अलीकडे कान्हेरी परिसरात एका मोठय़ा खडकाच्या तुकडय़ावर सापडले. तलावातील गाळाचा अंश त्या अग्निजन्य खडकावर एकाबाजूस विसावलेला होता. मुंबईच्या जन्माच्या अशा अनेक कूळकथा मुंबईच्या; पोटात दडलेल्या आहेत.. त्याविषयी पुढील भागात!

विनायक परब

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab