मुंबई : केईएम रुग्णालयात सुरू झालेल्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेमुळे ६५० बालकांना ऐकू येऊ लागले आहे. रतन टाटा यांच्या जयंती निमित्त केईएम रुग्णालयात ‘लिसन ऑफ लाईफ’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी या मुलांच्या पालकांना आणि मुलांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचा >>> चिराबाजारमधील व्यापाऱ्याचा अपघात निघाला हत्येचा कट; गुन्हे शाखेमुळे हत्येचा कट उलगडला

crime branch open plan to kill chirabazar businessman
चिराबाजारमधील व्यापाऱ्याचा अपघात निघाला हत्येचा कट; गुन्हे शाखेमुळे हत्येचा कट उलगडला
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Ajit Pawar shares Memory of Manmohan Singh
“…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Mumbai dengue cases increased slightly while winter fever cases decreased
राज्यात हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट तर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ
Maharashtra assembly elections 2024
इडीने छळले. सत्तेशी जुळले, धन फळफळले
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

भारतात दरवर्षी जन्माला येणाऱ्या अनेक मुलांची श्रवण चाचणी न होणे आणि पालकांना पाल्याच्या व्यंगाबद्दल विश्वास न बसणे अशा समस्यांमुळे अनेक मुलांमध्ये कायमचे व्यंग येते. त्यामुळे अशा मुलांना मदत करण्यासाठी केईएम रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. टाटा ट्रस्टने यासाठी नेहमीच मदत केली आहे. टाटा ट्रस्टने २०१७ पासून आतापर्यंत ३० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त केईएम रुग्णालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हेही वाचा >>> राज्यात हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट तर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ

कॉक्लियर इम्प्लांट केलेल्या मुलांचे पुढील भविष्य कष्टप्रद नसावे व त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी सर्व रुग्णांचे बँकेत खाते उघडण्यात येते. त्यामुळे कॉक्लियर इम्प्लांट यंत्रणेच्या देखभाचा खर्च भागविण्यास मदत होत असल्याची माहिती कईएम रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागाच्या प्रमुख डॉ. हेतल मार्फातिया यांनी दिली. यावेळी केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई, डॉ. मिलिंद नवलाखे, कूपर रुग्णालयाचे डॉ. समीर भार्गव, अलियावर जंग रुग्णालयाचे संचालक डॉ. सुमन कुमार यांनी उपस्थित रुग्ण आणि पालक यांना मार्गदर्शन केले. ज्यांना कॉक्लियर इम्प्लांट करणे आर्थिकदृष्ट्या परवड नाही, अशा रुग्णांना टाटा ट्रस्टकडून मदत केली जाते, असे टाटा ट्रस्टचे चैतन्य कुमार यांनी सांगितले. तसेच कमी वयात कॉक्लियर इम्प्लांट करून त्यानंतर पुढील काळजी घेण्यावर लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले.

Story img Loader