‘गाडी येत आहे, कृपया रेल्वे रूळ ओलांडू नका..’ मायभाषेसह राष्ट्रभाषा आणि इंग्रजीत सांगितल्या जाणाऱ्या या धोक्याच्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष करून घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या नादात जीव गमावल्याच्या घटना सर्रास घडतात. मात्र, गेल्या आठवडय़ात या घटनांनी टोक गाठले. १६ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत रल्वेच्या तीनही मार्गावर अशा तब्बल १५० घटना घडल्या. त्यात ६८ जणांना जीव गमवावा लागला तर ८७ जण अद्याप मृत्यूशी झुंज देत आहेत. बहुतांश अपघात (७१) मध्य रेल्वेमार्गावर घडले असून त्यात ३४ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ जण जबर जखमी झाले. रेल्वेमार्गावर होणाऱ्या या अपघातांबाबत लोहमार्ग पोलीसही काळजी व्यक्त करत आहेत.
लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य, पश्चिम आणि हार्बर या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा