मुंबई : राज्यात विविध आजारांनी या वर्षभरात ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये स्वाइन फ्लूने सर्वाधिक ३९ जणांचा मृत्यू झाला असून डेंग्यूने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जलजन्य आजारांमुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळ्यात पसरणाऱ्या जलजन्य आजारांबरोबरच अन्य साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असतात.

हे ही वाचा…मुंबईः लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण करून खंडणीची मागणी

साथीच्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक ३९ मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल डेंग्यूमुळे १७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ग्रामीण भागामध्ये १३ तर शहरी भागामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. जलजन्य आजारांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अतिसाराने पाच जणांचा, कॉलराने तीन जणांचा तर गॅस्ट्रो, कावीळ, लेप्टो व स्क्रब टायफसने प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 68 people died due to epidemic diseases in state mumbai print news sud 02