मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळीज प्रकल्पातील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील २,२७८ घरांसाठी अखेर हळूहळू प्रतिसाद वाढू लागला आहे. सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाणी या प्रकल्पास उपलब्ध झाल्यानंतर या घरांच्या मागणीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळेच २,२७८ घरांसाठी आतापर्यंत १,०६० इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. यापैकी ६९१ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विरार – बोळीजमधील दोन हजारांहून अधिक घरे अनेक वेळा सोडत काढूनही विकली जात नसल्याने कोकण मंडळाने या घरांचा समावेश ‘प्रथम प्राधान्य’ योजनेमध्ये केला आहे. या घरांच्या विक्रीसाठी रेडिओवर, तसेच लोकलमध्ये जाहिरातही करण्यात येत आहेत. त्याचबरोबर फलकबाजी करण्यात येत आहे. तरीही या घरांना प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर या घरांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक अर्जांची विक्री झाली असून सुमारे १०६० जणांनी अर्ज भरले आहेत. यापैकी ६९१ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत.

हेही वाचा – दीड कोटींच्या सोन्यासह दोन प्रवाशांना अटक; सीमाशुल्क विभागाची कारवाई

हेही वाचा – दीड हजार बालकांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया रखडल्या! वयोमर्यादा वाढविण्यात केंद्राकडून उदासीनता…

आता लवकरच अनामत रक्कमेसह सादर झालेल्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठवून त्यांच्याकडून घराची रक्कम भरून घेतली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या घरांसाठीची अर्जविक्री – स्वीकृती शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत सुरू राहणार आहे. दुसरीकडे नव्या धोरणानुसार विक्रीअभावी रिक्त राहिलेल्या घरांची विक्री करण्यासंबंधी पडताळणी सुरू आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत ही घरे विकली जातील, असा विश्वास कोकण मंडळाकडून व्यक्त केला जात आहे.