मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : ‘म्हाडा’च्या इमारत पुनर्रचना मंडळाने मुंबई मंडळाला दक्षिण मुंबईत १९ घरे वर्ग केली असून ही घरे सोडतीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात सहा घरे ही ताडदेव येथील क्रिसेन्ट टॉवरमधील १५२० ते १५३१ चौरस फुटांची असून या प्रत्येक घराची किमती साडेसात कोटी रुपये आहे. यापूर्वी अंधेरीतील जुहू विक्रांत प्रकल्पातील घरे सर्वाधिक किमतीची म्हणजेच चार कोटी ३८ लाख रुपयांची होती.

mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
avadhoot gupte marathi singer buy new apartment in khar mumbai area
अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ व्या मजल्यावर आहे फ्लॅट
work of Gavhan station is incomplete
गव्हाण स्थानकाचे काम अपूर्णच! लोकल स्थानकात थांबण्याची प्रवाशांना अद्याप प्रतीक्षाच
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली

मुंबईतील घरांसाठी २०१९ नंतर पहिल्यांदाच सोडत निघणार असून घरांची संख्या आणि किमती निश्चत करत जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली होती. त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार होती. पण, आता ही जाहिरात काही १५ ते २० दिवस पुढे गेली आहे. कारण दुरुस्ती मंडळाला खासगी विकासकांकडून मिळालेल्या दक्षिण मुंबईतील घरांपेकी २२ घरे मुंबई मंडळाला वर्ग केली आहेत. यातील १९ घरे मुंबई मंडळाने सोडतीत समाविष्ट करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून या घरांच्या विक्री किमती निश्चित करून अंतिम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठविल्या आहेत. ही घरे समाविष्ट करून नव्याने जाहिरात तयार करण्यासाठी आता वेळ लागणार आहे. त्यामुळे जाहिरातीस काहीसा विलंब होणार आहे. त्याचवेळी दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी, मोठय़ा प्रकल्पांमध्ये ही घरे असून उच्च आणि मध्यम गटातील ही घरे आहेत. दक्षिण मुंबईतील मोठय़ा घरांचा समावेश सोडतीत झाल्याने ही उच्च आणि मध्यम गटासाठी दिलासादायक बाब असणार आहे.

दुरुस्ती मंडळाने २२ घरे मुंबई मंडळाला वर्ग केल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. त्यातील १९ घरे सोडतीत समाविष्ट केल्याचे मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी या घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या असून यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठविल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगतिले. त्यानुसार दोन कोटी ते साडेसात कोटी रुपये अशा या घरांच्या किमती आहेत. यातील सर्वात महागडे घर हे ताडदेवमधील बी. बी. नकाशे मार्ग येथील एम पी मिल कंपाऊंड येथील क्रीसेन्ट टॉवरमधील असणार आहे. क्रीसेन्ट टॉवरमधील एकूण सात घरे सोडतीत असून यातील सहा घरे ही १५२०.९३ ते १२००.३८ चौरस फुटांची आहेत. त्यातील १२००.३८ चौरस फुटांचे एक घर वगळता इतर सहा घरे ही साडेसात कोटींच्या घरातील असल्याचे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

तीन ‘बीएचके’ची ही घरे असून उच्च गटातील या घरांना चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हाडाच्या इतिहासातील हे  सर्वात महागडे घर ठरणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये सर्वात महागडे, पाच कोटी ८० लाखांत घर विकले गेले होते. ग्रँट रोड येथील धवलगिरी प्रकल्पातील हे एक घर होते.

आतापर्यंतची सर्वात मोठी घरे..

पहिल्यांदाच सोडतीत सर्वात मोठी, अधिकाधिक क्षेत्रफळाची घरे सोडतीत दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून समाविष्ट झाली आहेत. ताडदेवमधील घरे १२०० ते १५३१.९३ चौ.फुटांपर्यंतची आहेत. आनंद हाइट्समधील घरे ७७६ ते १२४८.१६ चै. फुटांची आहेत. वडाळा इस्टेटमधील घरे १४०४.०७ चौ.फुटांची तर दुधवाला इमारतीतील घरे ७७० ते ९३४.३९ चौ. फुटांची आहेत. ही घरे मोठी असून तीन ‘बीएचके’ची असल्याचे समजते आहे. यापूर्वी म्हाडाने पाच कोटी ८० लाखांत विकले गेलेले घर हे अंदाजे ९५० चौ.फुटांचे होते. आतापर्यंत सर्वाधिक मोठे घर हे माटुंग्यातील तनिष्क प्रकल्पातील होते. या घराचे क्षेत्रफळ अंदाजे १०९७ चौ.फूट असे होते.