धोबीतलाव येथे सावकाराच्या दुकानावर दरोडा टाकताना त्याच्या मुलाची हत्या करून सुमारे एक कोटी रुपयांचा माल लुटल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सात जणांना जन्मठेपेची, तर दोघांना दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मेट्रो सिनेमासमोर पुखराज जैन यांचे कार्यालय आहे. येथे मोठय़ा प्रमाणात पैशांचा व्यवहार होत असल्याचे हेरून नऊ आरोपींनी त्यांच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यानुसार २३ मार्च २०१० रोजी आरोपी जैन यांच्या दुकानात घुसले. त्या वेळी पुखराज आणि त्यांचा मुलगा अल्पेश दुकानात होता. आरोपींना रोखण्याचा प्रयत्न दोघांनीही केला असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी दुकानातील सुमारे एक कोटी रुपयांचा माल घेऊन पोबारा केला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात पुखराज जखमी झाले, तर अल्पेश मृत्यूमुखी पडला. 

Story img Loader