मुंबई : दोन वर्षांपासून प्रशासकांच्या अखत्यारीत कामकाज सुरू असलेल्या महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदारयादीतून ७० हजार डॉक्टरांना बाद करण्यात आले आहे. राज्यासह देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले सहा ते सात डॉक्टर आमदार, खासदारांचाही यात समावेश आहे. या आमदार व खासदारांचा राजकारणात दबदबा असला तरी त्यांना महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेच्या निवडणुकीत बाद ठरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत आहे. त्यासाठीची मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र परिषदेने जाहीर केलेल्या मतदारयादीतून वगळण्यात आलेल्या ७० हजार डॉक्टरांवरून रणकंदन सुरू आहे. या ७० हजार डॉक्टरांमध्ये देशाच्या, तसेच राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सहा ते सात खासदार व आमदारांचा समावेश आहे. यातील काही खासदार व आमदारांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर काहींनी पदव्युत्तर वैद्याकीय शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेकडे नोंदणी करून सदस्यत्व घेतले. मात्र परिषदेने नव्याने राबविलेल्या नोंदणी प्रक्रियेमध्ये एमबीबीएस, एमडी, एमएस, नामांकित, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या डॉक्टर, आणि खासदार व आमदारांना नोंदणी करणे शक्य झाले नाही. अशा ७० हजार डॉक्टरांना निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मतदारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत आहे. मात्र मतदारयादीतून वगळण्यात आलेल्या ७० हजार डॉक्टरांवरून रणकंदन सुरू आहे.

निर्णयावर नाराजी

नोंदणी न केलेल्या डॉक्टरांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणे चुकीचे आहे, असे डॉ. शरद गायकवाड यांनी सांगितले. परिषदेवर प्रशासक असताना राज्यातील बोगस डॉक्टरांना आळा घालणे व नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी या उद्देशाने नव्याने नोंदणी प्रक्रिया राबवली होती. त्यामुळे नूतनीकरण न केलेल्या डॉक्टरांना ‘बोगस’ संबोधणे अपमानकारक असल्याचे हीलिंग हँड्स युनिटी पॅनलचे उमेदवार डॉ. तुषार जगताप यांनी सांगितले.

कुणाला वगळले ?

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे. एमएमसीच्या सदस्यत्वाच्या नूतणीकरणासाठी नोंदणी गरजेची आहे. नोंदणी न केल्यामुळे ते बोगस डॉक्टर होत नाहीत, फक्त ते नोंदणीकृत डॉक्टर नाहीत. डॉ. विंकी रुघवाणी, प्रशासक, एमएमसी