मुंबईः रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि वॉल्ट डिस्ने कंपनी यांच्या माध्यम क्षेत्रातील ७०,३५२ कोटी रुपयांचे विलीनीकरण पूर्ण झाल्याची गुरुवारी घोषणा करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजने कंपनीच्या विस्तारासाठी ११,५०० कोटी (१.४ अब्ज डॉलर) रुपयांची गुंतवणूक केली आहे. या संयुक्त कंपनीच्या नीता अंबानी अध्यक्ष असतील, असे या कंपन्यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा – ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
हेही वाचा – एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
े
u
रिलायन्स, व्हायकॉम १८ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि वॉल्ट डिस्ने यांच्या एकत्र येण्यातून माध्यम क्षेत्रात महाकाय कंपनी बनली असून तब्बल १२० पेक्षा अधिक दूरचित्रवाणी वाहिन्या, तसेच डिस्ने – हॉटस्टार आणि जिओ सिनेमा या दोन मोठ्या स्ट्रीमिंग सेवांचे एकत्रीकरण हे सोनी, झी एंटरटेनमेंट, नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनला स्पर्धक म्हणून तगडे आव्हान निर्माण करेल. विलीनीकरणानंतर एकत्रित संस्थेमध्ये रिलायन्स समूहाचा ६३.१६ टक्के हिस्सा (रिलायन्स इंडस्ट्रीज १६.३४ टक्के आणि वायकॉम ४६.८२ टक्के) तर उर्वरित ३६.८४ टक्के हिस्सा वॉल्ट डिस्नेकडे आहे. नीता अंबानी संयुक्त कंपनीच्या अध्यक्ष, तर मनोरंजन उद्योगांत दोन दशकांहून अधिक जागतिक स्वरूपाचा अनुभव गाठीशी असलेले उदय शंकर हे उपाध्यक्ष असतील.