फलाटांची लांबी वाढविण्यास १२, १३, १४ फेब्रुवारीला विशेष ब्लॉक
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ांसाठी फलाटाची लांबी वाढविण्यासाठी १२, १३ आणि १४ फेब्रुवारी हे तीन दिवस विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळात हार्बर मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. मुख्य मार्गावरील वाहतुकीत मात्र बदल होणार नसून हार्बर मार्गावरील गाडय़ा वडाळ्यापर्यंतच धावणार आहेत.
हार्बर मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन या मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ांची योजना एमयूटीपी-२मध्ये समाविष्ट आहे. त्यासाठी या मार्गावर फलाटांची लांबी वाढवण्याचे काम गेल्या दीड-दोन वर्षांपासून मुंबई सुरू आहे. यात वडाळा आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दोन स्थानकांवर लांबी वाढवण्याचे आव्हान एमआरव्हीसीसमोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काम काय?
या ब्लॉकदरम्यान फलाट क्रमांक दोनची लांबी वाढवणे, रुळांची जागा बदलणे, मशीद स्थानकाच्या दिशेला असलेली एक स्टेबलिंग लाइन काढून त्या जागी गाडय़ांचे रूळ बदलण्यासाठीचे सांधे बसवणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. येथील काही रूळही बदलावे लागणार आहेत.

काय होईल?
* हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा वडाळ्यापर्यंतच धावतील.
* ब्लॉकदरम्यान हार्बरची एकही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत येणार नाही.
* मात्र हार्बर मार्गावरील प्रवासी कुल्र्यावरून मुख्य मार्गाने मुंबईकडे येऊ शकतील.
* कुल्र्यावरून मुख्य मार्गाने काही जादा गाडय़ा सोडण्याचाही विचार.