Crime News Raigad And Mumbai : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे लग्नाचे आश्वासन देत एका महिलेने ७२ वर्षीय वृद्धाचा खून केला आहे. या प्रकरणी आरोपी महिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मृत व्यक्ती रामदास खैरे यांनी महिलेला काही दागिने आणि मौल्यवान वस्तू दिल्या होत्या. लग्नाला टाळाटाळ करायला लागल्याने मृत वृद्धाने हे दागिने आणि मौल्यवान वस्तू परत मागितले. त्यामुळे संतापलेल्या महिलेने वृद्धाचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बँक कर्मचारी असलेले मृत रामदास खैरे निवृत्तीनंतर श्रीवर्धन तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी राहायला गेले होते. रविवारी खैरे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना संपर्क करत अनेक दिवसांपासून ते फोन उचलत नसल्याचे सांगितले. जेव्हा पोलीस खैरे यांच्या घरी पोहचले तेव्हा, ते मृतावस्थेत सापडले. त्यावेळी त्यांच्या शरीरासह डोक्यावरही जखमा आढळल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी आणि मृत वृद्ध वर्षभर एकत्र

या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर पोलिसांना, खैरे आणि आरोपी महिला गेली वर्षभर एकत्र राहिले होते असे कळाले. खैरे यांचा खून झाला तेव्हा आरोपी महिला आणि तिचा पती हर्षल अंकुश परिसरातच होते याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यानंतर रायगड पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या पतील मुंबईतून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रामदास खैरे यांच्या पहिल्या पत्नीचे २०१२ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर मुलांना विचारून त्यांनी दुसरे लग्न केले. पण २०२१ मध्ये कोरोनामुळे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचेही निधन झाले. मुलांची लग्ने झाली असून, ती स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती रायगड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली.

मृताला तिसऱ्यांदा करायचे होते लग्न

आरोपी महिलेला रामदास खैरे लग्न करणार असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीकडून मिळाली. त्यानंतर आरोपी महिलेने खैरे यांच्याशी संपर्क केला. खैरेंशी संपर्क केल्यानंतर महिलेने लग्नाचे आश्वासन देत त्यांच्यासोबत राहायला सुरूवात केली. या दरम्यान खैरेंनी या महिलेला काही दागिने आणि मौल्यवान वस्तू दिल्या. यानंतर काही दिवसांनी आरोपी महिला खैरेंना सोडून मुंबईत राहू लागली. यानंतर खैरे यांनी महिलेकडे त्यांनी दिलेल्या मौल्यवान वस्तू आणि दागिने परत मागितले, त्यास महिलेने नकार दिला होता.

हे ही वाचा : “मराठी माणसाच्या दुश्मनांच्या हातात मुंबई सोपवण्याची…” मराठी-मारवाडी वादावर संजय राऊतांकडून भाजपा लक्ष्य

कसा केला खून?

या सर्व घडामोडी घडत असताना, आरोपी महिलेने जून २०२४ मध्ये हर्षल अंकुश या व्यक्तीशी लग्न केले. खैरे ब्लॅकमेल करत होते त्यामुळे पतीला बरोबर घेत महिलेने खैरेंचा खून करण्याची योजना आखली. ११ नोव्हेंबर रोजी ही महिला पुन्हा खैरे यांच्या घरी आली तर तिचा पती जवळच्याच एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

यानंतर २९ नोव्हेंबर रोजी आरोपी महिलेने खैरे यांच्या जेवणात कसलीतरी पावडर मिसळली, ज्यामुळे खैरे बेशुद्ध झाले. यानंतर आरोपी महिलेचा पती घरी आणि त्यांनी खैरेंचा मृत्यू होईपर्यंत त्यांच्या डोक्यावर वार केले.