लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम राबवत असून त्या अंतर्गत ७३२ गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधीत वाहने जप्त करण्यात आली आहेत. भादंवि कलम ७१८ अंतर्गत संबंधीत कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेला काही वाहनचालक त्यांची वाहने विरूद्ध दिशेने चालवित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. असे वाहनचालक वाहने विरूध्द दिशेने चालवून स्वतःच्या तसेच इतरांच्या जिवीतास धोका निर्माण करून वाहतूक नियमांचा भंग करीत असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने अशा प्रकारे विरूध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांना वाहतूकीची शिस्त लागावी म्हणून दिनांक १५ जून पासून २३ जूनपर्यंत मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम राबवली.

आणखी वाचा-२० टक्के सर्वसमावेश गृहयोजना… आता म्हाडा निर्माणाधीन प्रकल्पातील घरे घेणार

या मोहिमेत विरुद्ध दिशेने वाहने चालवल्याप्रकरणी ७३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भादंवि ७१८ कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संबंधीत वाहने जप्त केले आहे. यावेळी सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून शिस्तबध्द व सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहनही यावेळी पोलिसांकडून करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 732 offenses for driving in opposite direction mumbai print news mrj