मुंबई : राज्यभरातील ७,१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार  सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  सर्वत्र मतदान शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. मतमोजणी येत्या मंगळवारी  होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात ७ हजार १३५  ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.

डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Vijay Wadettiwar, Vijay Wadettiwar on Opposition Leader post , Opposition Leader post ,
“… तर विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करू”, वडेट्टीवारांचे विधान; काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून भाजपवर निशाणा
Prithviraj Chavan comment on Amit Shah, Amit Shah ,
अमित शहांच्या विधानातून संघाच्या द्वेष भावनेचे प्रदर्शन, पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला निशाणा
One Nation One Election Joint Parliamentary Committee
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना; प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह ३१ सदस्यांचा समितीत सहभाग
mahayuti government cabine expansion Vidarbha, Ministerships
विदर्भातील सात जिल्हे मंत्रिपदापासून वंचित, काही जिल्ह्याला तीन तर काहींना एकही नाही, असंतुलित वाटपाने नाराजी
Ravindra Chavan supporters are upset because they did not get the ministerial post print poltics news
रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजी
maharashtra Congress chief nana patole slams mahayuti government over leader of opposition post
विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करावा लागतो का? नाना पटाले अध्यक्षांना सवाल  म्हणाले….

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या

ठाणे – ३५, पालघर – ६२, रायगड – १९१, रत्नागिरी – १६३, सिंधुदुर्ग – २९१, नाशिक – १८८, धुळे – ११८, जळगाव – १२२, अहमदनगर – १९५, नंदुरबार – ११७, पुणे – १७६, सोलापूर – १६९, सातारा – २५९, सांगली – ४१६, कोल्हापूर – ५२९, औरंगाबाद – २०८, बीड – ७७१, नांदेड – १७०, उस्मानाबाद- १६५, परभणी – ११९, जालना – २५४, लातूर – ३३८, हिंगोली – ६१, अमरावती – २५२, अकोला – २६५, यवतमाळ – ९३, बुलडाणा – २६१, वाशीम – २८०, नागपूर – २३४, वर्धा – १११, चंद्रपूर – ५८, भंडारा – ३०४, गोंदिया – ३४५, गडचिरोली- २४. एकूण – ७१३५.

Story img Loader