मुंबई : शीव येथे गृहप्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली सुमारे ७५ ग्राहकांकडून ६६ कोटी ८० लाख रुपये घेऊन सदनिका न देता त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोन विकसकांविरोधात अॅन्टॉपहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१३ पासून तक्रारदाराने सदनिकेसाठी थोडी-थोडी रक्कम दिल्याचा आरोप असून याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.

हेही वाचा >>> Video: आधी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि मग मूर्तीचा मुकूट चोरला; सीसीटीव्हीत चोरी कैद

व्यावसायिक प्रसून जोहारी(३९) हे माहिम येथील रहिवासी असून त्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, शीव कोळीवाडा परिसरातील जीअर्स रेसिडन्सी या प्रस्तावीत इमारतीत तक्रारदार यांनी चार सदनिका खरेदी केल्या होत्या. त्यासाठी आरोपी बांधकाम व्यासवसायिकांना तक्रारदार यांनी दोन कोटी ३४ लाख रुपये दिले होते. तक्रारदार यांच्यासह इतर ७४ ग्राहकांनीही २००८ ते २०२४ या कालावधीत एकूण ६६ कोटी ८० लाख रुपये भरण्यात आले होते. पण वेळेत या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी जोहरी यांच्या तक्रारीवरून आशित दोषी व मनीष शहा यांच्याविरोधात अॅन्टॉपहिल पोलीस ठाण्यात फसवणूक, फौजदारी विश्वासघात व मोफा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

हेही वाचा >>> ४५ वर्षीय व्यक्तीवर स्वादुपिंडाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया!

अंधेरीत ६८ ग्राहकांची १३ कोटींची फसवणूक

आणखी एका प्रकरणात अंधेरी पूर्व येथे ६८ सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांची १३ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी जीतेंद्र ब्रम्हभट नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, अंधेरी पश्चिम येथील विरा देसाई रोड येथे प्रथमे फेज ४ प्रकल्पामध्ये तक्रारदार अमजद अरबानी याच्यासह ६८ सदनिकाधारकाकडून २० टक्क्यांहून अधिक रक्कम घेण्यात आली. त्यानंतरही अद्याप त्यांना सदनिका मिळाली नाही अथवा त्यांची घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. याप्रकरणी मोफा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करत आहे. २००६ पासून तक्रारदारांनी रक्कम दिली असून प्राथमिक चौकशीनंतर याप्रकरणी बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.