मुंबई :आयआयटी मुंबईतील 75 टक्के विद्यार्थ्यांना गेल्या शैक्षणिक वर्षात नोकरी मेळाव्यातून (कॅम्पस प्लेसमेंट) राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरी मिळाली आहे.शिक्षण पूर्ण करणाऱ्या किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून निवड करतात. वर्षातून दोनदा होणारे आयआयटीचे कॅम्पस प्लेसमेंट चर्चेचे ठरतात. यंदा प्लेसमेंटमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७५ टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळाली आहे. मात्र यंदा विद्यार्थ्यांच्या सरासरी पगारात (पॅकेज) ७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी २१ लाख ८० हजार सरासरी पगार देण्यात आला होता. यंदा पगाराची सरासरी २३ लाख ५० हजार रुपये आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यंदा २ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी मुलाखत दिली. त्यातील १ हजार ४७५ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे.

हे ही वाचा…बुलेट ट्रेन प्रकल्पातील स्थानकांना गती, महाराष्ट्रातील स्थानकांची कामे हाती

आयआयटी मुंबईच्या मुलाखत मेळाव्यात आतापर्यंत सर्वात कमी पगार सहा लाख रुपये होता. मात्र यंदा किमान पगार चार लाख रुपये करण्यात आले असूनही १० विद्यार्थ्यांनी वार्षिक चार ते सहा लाख रुपयांची नोकरी स्वीकारली आहे. १२३ कंपन्यांनी ५५८ जणांना वार्षिक २० लाखांपेक्षा अधिक पगार देऊ केला आहे. तर ७० कंपन्यांनी २३० जणांना १६.७५ ते २० लाखांपर्यंत वार्षिक वेतन दिले आहे. दरम्यान २२ जणांना एक कोटी पेक्षा जास्त रकमेचे पॅकेज मिळाले आहे.

यंदा सर्वाधिक २३२ नोकऱ्या या विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) क्षेत्रात देण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल संगणक अभियांत्रिकी (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) २३० नोकऱ्या, यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) २२९ नोकऱ्या, रसायन अभियांत्रिकी (केमिकल इंजिनिअरिंग) ११९ आणि स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) ११३ या क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

तसेच परदेशात ७८ जणांना नोकऱ्या मिळाल्या, तर भारतातील बहुउद्देशीय कंपन्यांमध्ये ७७५ जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. भारतातील कंपन्यांनी ६२२ जणांना नोकऱ्या दिल्या आहेत.

हे ही वाचा… Sanjay Raut : “मुंबई विमानतळावरचा शिवरायांचा पुतळा अदाणी आणि भाजपाने अडगळीत..”, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

यंदा आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात फारशी उत्साहवर्धक नव्हती. मात्र एप्रिलनंतर प्रमाणात नोकऱ्या देण्यात आल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75 percent students from iit mumbai got job in campus placement mumbai print news sud 02