राज्य भारनियमनमुक्त जाहीर झाले असले तरी वीजचोरी आणि अल्प वसुलीच्या निकषामुळे राज्याच्या जवळपास १७ टक्के भागात अद्यापही भारनियमन सुरू आहे. त्यातही वीजचोऱ्यांच्या अतिरिक्त प्रमाणामुळे जालना, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव अशा सात जिल्ह्य़ांतील सुमारे ७५ टक्के भाग भारनियमनामुळे अंधारात आहे. दरम्यान,अनेक उपाय थकल्यानंतर आता या भागातील वीजचोरीला आळा घालण्यासाठी आता ‘महावितरण’ने अध्यात्माच्या मार्गाचा अवलंब सुरू केला आहे. त्यासाठी कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
वीजचोरी जास्त असलेल्या भागातील उपाययोजनांमुळे येत्या काही काळात वीजचोऱ्या कमी झाल्या नाहीत, वसुली वाढली नाही तर त्या भागाच्या मुख्य अभियंत्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच याबाबतची नोंद मुख्य अभियंत्याच्या वार्षिक गोपनीय अहवालातही करण्याचे ‘महावितरण’ने ठरवले आहे.
राज्य भारनियमनमुक्त करताना ४२ टक्क्यांपेक्षा अधिक वीजचोरी आणि अल्प वीजबिल वसुली असलेल्या भागांत भारनियमन सुरूच ठेवण्याचे धोरण जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील १३०० फीडरवर सध्या भारनियमन सुरू आहे. त्यापैकी ७६९ फीडर हे जालना, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, वाशिम, परभणी या सात जिल्ह्य़ांत आहेत. मात्र अतिरिक्त वीजचोरी आणि अल्प वसुली यामुळे या सात जिल्ह्य़ांचा ७५ ते ८० टक्के भाग अद्यापही भारनियमनाचे चटके सहन करत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा