मुंबई परिसरातून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरील कारवाई सुरूच असून शनिवारी आणखी ७६ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा १ अंतर्गत असलेल्या शाखेने ही कारवाई केली.   मुंबईत मोठय़ा प्रमाणात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असून मुंबई आणि परिसरातील भागात ते रहात असल्याचे गेल्या काही दिवसांतील कारवाईतून स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी पोलिसांनी मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळून ६, वसई (पूर्व)येथील अग्रवाल ईस्टेट मधून ४८ तसेच आणि नवी मुंबई, तुर्भे येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतून २८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यातील बहुतांश बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. या बांगलादेशी नागरिकांकडे कसल्याही प्रकारचे पुरावे सापडले नसल्याचे विशेष शाखेचे उपायुक्त संजय शिंत्रे यांनी सांगितले.

Story img Loader