लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : शेअरमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंधेरीतील एका महिलेची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार नवी मुंबईतील एका खाजगी कंपनी उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिंबधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेने गुंतवलेल्या ७६ लाख रुपयांवर एक कोटी रुपये नफा झाल्याचा दावा करून अज्ञात आरोपींनी फसवणूक केली. आरोपींनी आणखी रकमेची मागणी केल्यानंतर आपली फसणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
viral video of woman stole a bench outside the building shocking video goes viral on social media
VIDEO: अशा महिलांचं करायचं तरी काय? भरदिवसा महिलेनं काय चोरलं पाहून हसावं की रडावं? हेच समजणार नाही
300 crore extortion from female officer on fear of involvement in embezzlement Mumbai print news
३०० कोटींच्या गैरव्यवहारातील सहभागाची भीती दाखवून महिला अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली; चौघांविरोधात गुन्हा
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
Fraud for 50 thousand rupees by claiming to cure cancer in thane
कर्करोगावरील उपचाराच्या नावाने फसवणूक
Shocking video 4 Women Looted Jewellery over 16.5 Lakh gold heist caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं १६ लाखांचं सोनं

अंधेरीमध्ये वास्तव्यास असलेल्या ५६ वर्षीय महिला तक्रारदार एका खाजगी कंपनीत उपाध्याक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे मार्च २०२४ पासून त्या घरातूनच कार्यालयीन काम करीत होत्या. एप्रिल महिन्यात एका अज्ञात व्यक्तीने त्यांना एका ग्रुपमध्ये सामिल केले. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भातील दैनदिन माहिती दिली जात होती. ग्रुपमधील ॲडमिन सभासदांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत होता. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास किती फायदा होईल याबाबत माहिती मिळत असल्याने त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी ॲडमिनशी चर्चा करून एक ॲप डाऊनलोड केले. यावेळी त्यांना अनुसूया आणि अवरजराज गुप्ता नावाच्या व्यक्तींनी शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत योजनांची माहिती दिली. तसेच त्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. त्यामुळे तिने २ एप्रिल ते ३० जून २०२४ या कालावधीत विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये सुमारे ७६ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

आणखी वाचा-मुंबई : गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव

या गुंतवणुकीवर त्यांना एक कोटीपेक्षा अधिक फायदा झाल्याचे ॲपवर दिसत होते. मात्र त्यांनी प्रयत्न केला असता त्यांच्या ॲपमधून बँक खात्यात रक्कम हस्तांतरित होत नव्हती. त्यामुळे त्यांनी ॲडमिनकडे विचारणा केली असता त्याने तिला तीन लाख रुपये जमा केल्यानंतर ही रक्कम तिच्या बँक खात्यात हस्तांतरित होईल असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने तिच्या मुलीला याबाबत सांगितले. यावेळी तिने सायबर फसवणूक झाल्याचे सांगितले. तसेच सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तक्रारदाराने सायबर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित अज्ञात आरोपीविरोधात तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी १२० बी, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भारतीय दंड सहिता सहकलम ६६ सी, ६६ डी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा सायबर पोलिसकडून तपास सुरू आहे.