मुंबई : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या ७८ वर्षीय व्यक्तीला बोरिवली येथील एमएचबी कॉलनी पोलिसांनी शनिवारी अटक केली. पीडित मुलगी खेळत असताना आरोपीने तिला जवळ बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. याप्रकरणी आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित मुलगी १० वर्षांची असून ती खेळायला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. ती घराजवळ खेळत असताना ७८ वर्षीय आरोपीने तिला हाक मारली. त्यावेळी ती आरोपीजवळ गेली असता त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली. ती घरी आली, त्यावेळी घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकार पोलिसांना सांगितले.

हेही वाचा…शक्तिपीठ, भक्तिपीठचा ‘राजकीय महामार्ग’ प्रशस्त !

त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पीडित मुलीच्या आईची तक्रार नोंद करून याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपीची माहिती घेऊन त्याच्याशोधासाठी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. आरोपीला रात्री उशिरा राहत्या परिसरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी एमएचबी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 78 year old man was arrested in borivali for sexually abusing minor girl mumbai print news sud 02