राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला २ सप्टेंबरपासून परवानगी मिळाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत ८ हजार ५०१ तिकीटे आरक्षित करण्यात आली आहेत. त्याद्वारे १४ हजार ६०० प्रवासी प्रवास करणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरात २०० विशेष रेल्वेगाडय़ा धावत आहेत. यातील मध्य रेल्वेच्या मुंबईतून परराज्यात जाणाऱ्या १६ व  येणाऱ्या १६ गाडय़ांचा समावेश आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी या विशेष गाडय़ांनाच महाराष्ट्रातील स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत. याच गाडय़ांतून प्रवास होणार असून नियमित गाडय़ा मात्र सुरू के लेल्या नाहीत. प्रवाशांना या गाडय़ांचे १२० दिवस आगाऊ आरक्षण करता येणार आहे. त्यानुसार ८ हजार ५०१ तिकीटे आरक्षित करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 thousand 501 tickets reserved for inter state travel central railway information abn