मुंबई  करोनाच्या साथीनंतर यावर्षी देवनार पशुवधगृहात बकरी ईदची मोठी लगबग सुरू झाली आहे. विविध राज्यांमधून मोठय़ा प्रमाणात व्यापारी आपले बकरे घेऊन याठिकाणी दाखल झाले आहेत. देवनार पशुवधगृहात बुधवपर्यंत एकूण ८० हजार बकऱ्यांची आवक झाली. चार दिवसांत हा आकडा एक लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

देवनार पशुवधगृहात दोन वर्षांनंतर यावर्षी बकऱ्यांचा मोठा बाजार भरला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून व्यापारी आपले बकरे घेऊन याठिकाणी दाखल झाले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून याठिकाणी बकरे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार बुधवारी दुपापर्यंत याठिकाणी ८६ हजार ३६३ बकऱ्यांची आवक झाली आहे. तर बुधवापर्यंत यातील ३६ हजार ६०५ बकऱ्यांची विक्री झाली आहे.

ईदसाठी आणखी चार दिवस बाकी असल्याने या वर्षी हा आकडा लाखाच्या वर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. बकरे व त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यापाऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी पालिकेकडून घेण्यात आले आहे. अनेकदा याठिकाणी बकरे चोरीच्या घटना देखील मोठय़ा प्रमाणात घडत असतात.

Story img Loader