श्रुती कदम

मुंबई : साधारण तिसऱ्या शतकात भारत आणि रोमन साम्राज्यामध्ये इजिप्तमार्गे होणारा व्यापार, बौद्ध तत्त्वज्ञानाचा अनेक देशांमधील प्रसार यांचा नव्याने एका संशोधनातून दाखला मिळाला आहे. इजिप्तच्या बेरेनीके बंदरावर संशोधकांना गौतम बुद्धांची मूर्ती आणि शिलालेख सापडले असून याबाबत एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला.

स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Mahatma Gandhi Laxman Shastri Joshi British Railways
तर्कतीर्थ विचार: महात्मा गांधींच्या सहवासात…
Indus Script
Harappan Script: हडप्पाकालीन लिपी उलगडणं इतकं कठीण का आहे?
Technology and Urbanization Human Progress
तंत्रकारण: तंत्रज्ञान आणि नागरीकरण
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन
Loksatta anvyarth Science Culture India Nuclear Testing and Use of Atomic Power
अन्वयार्थ: विज्ञान संस्कृतीचा मेरुमणी

अमेरिकन-पोलिश मोहिमेने केलेल्या उत्खननात २०१८ साली डेलावेअर विद्यापीठचे प्रा.स्टीव्हन साइडबोथम आणि त्यांच्या संघाला गौतम बुद्ध यांची इसिस देवीला समर्पित केलेली संगमरवरी मूर्ती शहराच्या मुख्य रोमन काळातील मंदिरासमोर उत्खननात सापडली. परंतु तेव्हा या मूर्तीचे फक्त धड संशोधनात सापडले होते. मूर्तीबाबत जर्मन परिषदेत पुरातत्वशास्त्रज्ञ शैलेन भंडारे यांनी ही मूर्ती गौतम बुद्धांची असल्याचे सांगितले होते. करोनाकाळानंतर २०२२ साली झालेल्या उत्खननात या मूर्तीचे शीर सापडले. त्यामुळे ही मूर्ती गौतम बुद्धांचीच असल्याचे स्पष्ट झाले. या मूर्तीशिवाय, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना रोमन सम्राट फिलिप द अरब (इ.स. २४४ ते २४९ ) शासनाशी संबंधित संस्कृत भाषेतील शिलालेखदेखील सापडला आहे. हा शिलालेख बौद्ध तत्त्वज्ञानाशी संबंधित असावा, असे भंडारे यांनी सांगितले.

या शिलालेखाचा पुरातत्त्वशास्त्रज्ञ बारकाईने अभ्यास करत आहेत. इसिस देवीच्या मंदिरातील इतर शिलालेख हे ग्रीक भाषेतील आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मंदिरात दुसऱ्या शतकातील सातवाहनांची दोन नाणीही या उत्खननात सापडली. गेल्यावर्षी, जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये ही मूर्ती सापडली होती. अलीकडेच इजिप्तच्या पुरातत्त्व परिषदेने हे संशोधन जाहीर केले. हे संशोधन प्रा. स्टीव्हन साइडबोथम, शैलेन भंडारे आणि अन्य पुरातत्त्व शास्त्रज्ञ अमेरिकेतील पुरातत्त्व संस्थेसमोरही सादर करणार आहेत. या संशोधनामुळे भारतीय पुरातत्त्व अभ्यासात महत्त्वाची भर पडली आहे. इजिप्तमधील बौद्ध धर्मासाठी आतापर्यंत उत्खननात सापडलेला हा सर्वोत्तम पुरावा आहे, असे भंडारे यांनी सांगितले.

भारत आणि इजिप्तचे ऐतिहासिक नाते..

भारत आणि रोमन साम्राज्यामधील दुवा म्हणजे इजिप्त. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात रोमन साम्राज्य आणि भारत यांच्यातील व्यापार रेशीम मार्गाने व सागरीमार्गे होत असे. त्यामुळे इजिप्त हे व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते. इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील रोमन-युगीन बंदरे व्यापारात गुंतलेली होती. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे बेरेनीके हे बंदर. मिरपूड, रत्ने, कापड आणि हस्तिदंत यांच्या व्यापारासाठी भारतातून जहाजे या बंदरावर येत. बेरेनीके येथे माल उतरवून तो उंटांवर लादून वाळवंट ओलांडून नाईल नदीपर्यंत पोहोचवला जात असे. त्यानंतर तो उर्वरित रोमन साम्राज्यात विक्रीसाठी जात होता.

मूर्ती कशी आहे?

गौतम बुद्धांची उभ्या स्थितीतील ही मूर्ती ७१ सेमी उंचीची आहे. त्यांनी कपडय़ांचा काही भाग त्यांच्या डाव्या हाताने धरला आहे. त्यांच्या डोक्याभोवती सूर्यकिरण असलेले एक प्रभामंडल आहे. शेजारी कमळाचे फूल आहे. ही मूर्ती बेरेनीके येथे स्थानिकांनीच घडवली असावी आणि भारतातील एक किंवा अधिक श्रीमंत व्यापाऱ्यांनी ती मंदिराला समर्पित केली असावी. त्याचबरोबर मूर्तिकार हा रोमन आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यासक असावा, असे पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मूर्तीतील सूर्य प्रभामंडल हे रोमन शैलीत आहे.

Story img Loader