मुंबई : भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांसाठी हवाला रॅकेट चालवल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. आरोपींनी बनावट कागदपत्राद्वारे आधारकार्ड व बँक खाती उघडल्याचे तपासात निष्पन्न झाले. बांगलादेशातून बेकायदेशीररित्या मुंबईत आणून कामधंदा मिळवून दिल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अक्रम नूर नवी शेख (२६) या दलालाला अटक केली होती. आरोपी भारतातून कमवलेली रक्कम बांगलादेशात अवैध्यरित्या पाठवण्याचेही काम करीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> मोठी बातमी! भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिली; नौदलातील तरुणाला अटक

आरोपीच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे, नवी मुंबई परिसरातून आणखी आठ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आल्याचे उपायुक्त (गुन्हे) राज तिलक रौशन यांनी सांगितले. शेख हा मूळचा बांगलादेशातील चितगाव राज्यातील नोरत्तमपूर येथील रहिवासी आहे. अक्रम सध्या मुंबईतील वडाळा परिसरात राहत होता. आरोपी स्वतः बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आला होता. येथे आल्यानंतर आरोपीने त्याचा साथीदार शफीक याच्यासह तेथील नागरिकांना बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आणण्यास सुरू केली. भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश देऊन मुंबईत कामधंदा मिळवून देण्याचे काम अक्रम करीत होता. त्यासाठी तो प्रति व्यक्ती २० हजार रुपये घेत असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. तसेच अक्रम कमिशन घेऊन बांगलादेशी नागरिकांनी भारतात कमावलेली रक्कम बांगलादेशात पाठवण्याचेही काम करीत होता. अक्रम शिवडी स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-६ च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बांगलादेशात रक्कम पाठवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीमार्फत अक्रमशी संपर्क साधण्यात आला. तो शिवडी येथे आल्यानंतर त्याला शनिवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.