लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीचे काम वेगात सुरू असून आतापर्यंत (२ एप्रिल) एक लाख ११ हजार ८९ कामगारांनी आपली कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी ९४ हजार २२५ कामगार पात्र ठरले असून चार हजार १११ कामगार अपात्र ठरले आहेत. अजूनही जवळपास ४९ हजार अर्जदार कामगारांनी कागदपत्रे जमा केलेली नाहीत. त्यामुळे कागदपत्र जमा करून घेण्याची प्रक्रिया अजूनही म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुरू आहे.

Electricity system Maharashtra, strike employees,
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडणार! कर्मचाऱ्यांनी पुन्हा उगारले संपाचे अस्त्र
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
electric mobility promotion scheme 2024 to be extended says hd kumaraswamy
अवजड उद्योगमंत्र्यांचा मात्र ई-वाहनांना प्रोत्साहन कायम राहण्याचा दावा
Ladki Bahin Yojna
लाडकी बहीण योजना अन् महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये; सरकारच्या योजनेतून मतांची पेरणी?
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
Dharashiv, crop loan, Case managers,
धाराशिव : पाच बँकांकडून शून्य टक्के पीककर्ज वाटप, दहा व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल; आणखी २५ रडारवर
uddhav thackeray latest marathi news,
“सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन
pradhan mantri jan dhan yojana latest marathi news
आर्थिक उन्नतीचे ‘जनधन’

गिरण्यांच्या जमिनीवरील गृहयोजनेचा लाभ घेण्यासाठी पावणेदोन लाख अर्ज सादर झाले आहेत. एक लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान राज्य सरकार समोर आहे. यासाठी राज्य सरकारकडून धोरण आखण्यात येत आहे. मात्र या धोरणाची अंमलबजावणी आणि घरांची सोडत काढण्याआधीच मुंबई मंडळाने दीड लाख कामगारांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेला सप्टेंबर २०२३ पासून सुरुवात झाली असून अजूनही ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवार, २ एप्रिलपर्यंत एक लाख ११ हजार ८९ गिरणी कामगारांनी कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी एक लाख ६९६ कामगारांनी संगणकीय पद्धतीने (ऑनलाईन) तर ऑफलाईन पद्धतीने १० हजार ३९३ कामगारांनी कागदपत्रे जमा केली आहेत.

आणखी वाचा-मराठा आरक्षणाशी संबंधित याचिकांवर आता उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी

मुंबई मंडळाकडे कागदपत्र जमा केलेल्या एक लाख ११ हजार ८९ कामगारांपैकी ९४ हजार २२५ कामगार पात्र ठरले आहेत. तर चार हजार १११ कामगार अपात्र ठरल्याची माहिती मुंबई मंडळाकडून देण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र सादर करणाऱ्यांपैकी नऊ हजार ३९ कामगार पात्र तर ऑनलाईन कागदपत्र जमा करणाऱ्यांपैकी ८५ हजार १८६ कामगार पात्र ठरले आहेत. तर अपात्र ठरलेल्या चार हजार १११ कामगारांपैकी १२०२ कामगारांनी ऑफलाईन कागदपत्रे जमा केली असून २९०२ जणांनी ऑनलाईन कागजपत्रे जमा केली आहेत. कागदपत्रे सादर केलेल्या १२ हजार ७५३ कामगारांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर सभागृहात ऑफलाईन पद्धतीने गिरणी कामगारांकडून अर्ज सादर करून घेतले जात होते. पण येथील केंद्र आता बंद करण्यात आले असून म्हाडा भवनातील मित्र कक्षात आता कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत.