९५ वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत बेळगाव येथे होणार आहे. संगीत व गद्य नाटक, संगीत मैफल, बालनाटय़, मुक्त रंगमंच असे विविध कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ रंगकर्मीच्या भूमिकांना उजाळा देणारा चित्ररथ हे संमेलनानिमित्त काढण्यात येणाऱ्या नाटय़दिंडीचे खास आकर्षण असणार आहे.
मुंबईत शुक्रवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्षा लता नार्वेकर यांनी नाटय़ संमेलनाविषयी सविस्तर माहिती दिली.
मुख्य संमेलनाच्या अगोदर म्हणजे १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमही होणार असून त्याची जबाबदारी नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेकडे सोपविण्यात आली आहे. तीन नाटके, एक संगीतविषयक कार्यक्रम आणि अन्य स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनात सीमा प्रश्नाचा ठराव घ्यायचा किंवा नाही या वादावरून बेळगाव नाटय़ संमेलनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र निर्माण झालेला सर्व वाद आता निवळला असून सगळ्यांचे सहकार्य संमेलनासाठी मिळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा