मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्रातील भूसंपादनाच्या कामाला गती मिळाली असून आतापर्यंत राज्यात ९८ टक्के भूसंपादन झाल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लागणाऱ्या ४३०.४४ हेक्टरपैकी ४२२.७२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. म्हणजेच राज्यात ९८.२० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. मुंबईतील ४.८२ हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात २८८.७७ हेक्टरपैकी २८५.९९ हेक्टर, तर ठाणे जिल्ह्यात १३६.८५ हेक्टरपैकी १३१.९१ हेक्टर म्हणजेच ९६.४२ टक्के जागा संपादित करण्यात आली आहे..

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
11 thousand crores to BEST in the last decade Mumbai Municipal Corporation administration rejects allegations of treating the initiative with contempt Mumbai print news
गेल्या दशकात ‘बेस्ट’ला ११ हजार कोटी; उपक्रमाला सापत्न वागणूक दिल्याचा आरोप मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अमान्य
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
46 unauthorized water connections disconnected in Ulhasnagar news
उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या; पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा

महाराष्ट्र, गुजरात, दादरा-नगर हवेलीची मिळून सरासरी ९८.६८ टक्के भूसंपादन झाल्याचे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापैकी गुजरातमध्ये ९८.८७ टक्के आणि दादरा-नगर हवेलीतील १०० टक्के जागा संपादित झाली आहे. गुजरातमध्ये पूल उभारण्यासाठी पाया, गर्डरची कामे वेगाने सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. १४.३६ किलोमीटर पाया आणि १५ किलोमीटरपर्यंतचे गर्डर टाकण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> मुंबई : महाविद्यालयात प्रवेश हवाय…; फसवणुकीपासून सांभाळा

राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली जात आहे. प्रकल्पातील जमीन संपादनासाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची मुदत होती. या प्रकल्पातील एकूण भूसंपादनासाठी ३१ मार्च २०१९ ही नवीन मुदत निश्चित केली होती. परंतु या मुदतीतही हे काम पूर्ण करता आले नाही. त्यानंतर वेळोवेळी नवीन अंतिम मुदत जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापेक्षाही अधिक काळापासून केंद्र आणि राज्य सरकारमधील अंतर्गत वादामुळे प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते. जून २०२२ मध्ये राज्यात ७१ टक्के भूसंपादन झाले होते. मात्र आता प्रकल्पाचे भूसंपादन वेगाने होत आहे. शिवाय अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात सुरुवातीचे स्थानक असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल स्थानकाच्या बांधकामासाठी नामांकीत कंपन्या इच्छुक आहेत. स्थानकाचा आराखडा व बांधकामासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने तांत्रिक निविदा मागविल्या होत्या. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच वांद्रे कुर्ला संकुल – शिळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बहुचर्चित ५०८ किलोमीटर लांबीच्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गांपैकी ३५० किलोमीटर लांबीचा वापी – अहमदाबाद मार्ग येत्या तीन – वर्षानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे.

Story img Loader