मुंबई : अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या ९९व्या नाटय़संमेलनाच्या प्रतीकचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या कार्यक्रमास अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे मुंबई उपाध्यक्ष नरेश गडेकर, स्वागत समिती संयोजक संदीप जोशी, प्रमुख निमंत्रक प्रफुल्ल फरकसे आणि स्वागत समितीचे सरचिटणीस किशोर आयलवार उपस्थित होते.

नाटय़संमेलन ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली २२, २३, २४ आणि २५ फे ब्रुवारीला नागपूर येथे होत आहे. १९८५नंतर म्हणजे ३४ वर्षांनंतर दुसऱ्यांदा नागपूर येथे नाटय़संमेलन होत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे.

Story img Loader