मुंबई : मावशीच्या पतीने १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घाटकोपर येथे घडला. पीडित मुलीच्या समुपदेशनात हा प्रकार उघड झाला. त्यानंतर समुपदेशन करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने याप्रकरणी घाटकोपर पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५ वर्षांची पीडित मुलगी एप्रिल महिन्यात घाटकोपर येथे मावशीच्या घरी आली होती. त्यावेळी मावशीच्या पतीने पीडित मुलीला पॉर्न व्हीडीओ दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीचे तक्रारदार महिलेने नुकतेच समुपदेशन केले. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. आरोपी तिचा नातेवाईक असल्यामुळे तिने घाबरून हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अखेर पीडित मुलीचे समुपदेशन करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने याप्रकरणी घाटकोपर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी शुक्रवारी पीडित मुलीच्या मावशीच्या पतीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, एप्रिल महिन्यात आरोपीने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 15 year old girl was raped by her aunt husband in ghatkopar mumbai print news amy