मुंबई : जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून चेंबूर येथे एका २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल रणदिवे (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो चेंबूरमधील सम्राट अशोक नगर येथील रहिवासी होता. त्याचा भाऊ सुनील रणदिवे (२३) याच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सुनील रणदिवे याचा सजावटीचा व्यवसाय आहे.

हेही वाचा – मुंबईतल्या तुरुंगात कैद्यांना ड्रग्ज पुरवणारा पोलीस हवालदार अटकेत, न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची कोठडी

हेही वाचा – गोरेगाव आग दुर्घटनेनंतर ‘झोपु’ प्राधिकरणाचा निर्णय; सात मजली इमारतींना लोखंडी जिने

तक्रारीनुसार अनिल चेंबूर आर. सी. मार्ग येथील सन्निधी बार येथे जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे आरोपी रितीक बजाज (२३) व हर्षद वलोड्रा (२७) हेही उपस्थित होते. जेवणाचे पार्सल पहिला कोण घेणार या वादातून दोन्ही आरोपींनी अनिलला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी कड्याने अनिलला मारहाण केली. अनिलच्या तोंडावर, डोक्यावर व छातींवर गंभीर दुखापत झाली. अनिल खाली कोसळला. अनिलला तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 22 year old youth murder in chembur after a dispute over a food parcel mumbai print news ssb