मुंबई : ताडदेव येथील तुळशीवाडी परिसरात ४६ वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याप्रकरणी २३ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी शनिवारी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मनिष अशोक मारू (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो तुळशीवाडी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी मारू याचे त्याच परिसरात राहणाऱ्या मयूर मंगलजी राठोड याच्याशी यापूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून शुक्रवारी मारू याने राठोडवर चाकूने हल्ला केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राठोड यांना तातडीने मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान राठोड यांचा मृत्यू झाला. त्यात राठोड यांच्या मानेवर व पोटावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी राठोडचे वडील मंगलजी राठोड (७६) यांच्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी मारू विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी रात्री त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार अद्याप जप्त करण्यात आले नसून पोलीस त्याबाबत अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 23 year old youth was arrested in connection with the murder in tardeo mumbai print news ysh