लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईः रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाने ३१ वर्षीय तरूणावर अनैसर्गिक अत्याचार करून रोख रक्कम , मोबाईल व एटीएम कार्ड लुटल्याची तक्रार घाटकोपर पोलिसांकडे आली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तक्रारदाराचा रिक्षाच्या भाड्यावरून एल.बी.एस रोड येथे माणिकलाल गार्डन येथे रिक्षा चालकाशी वाद झाला. त्यानंतर रिक्षा चालकाने त्याला डोक्यात सिमेंट ब्लॉकने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन तक्रारदार यांच्याकडील मोबाईल फोन, रोख रक्कम व एटीएम कार्ड काढून घेतले.

हेही वाचा… ‘नाका तिथे शाखा’ सुरू करण्याचे राज ठाकरेंचे आदेश

त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार, जबरी चोरी व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 31 year old youth was brutally assaulted by a rickshaw driver over a dispute of rickshaw fare in mumbai print news dvr