मुंबईः सुमारे एक कोटी रुपयांच्या चरस पुरवण्यास आलेल्या श्रीकांत मधुकर धनू (५७) याला डोंगरी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पावणेतीन किलो चरस जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुंबई : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात एक जण जखमी, तिघांविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा – भिंवडी येथील इमारत कोसळून आठजणांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण, इमारतीच्या मालकाला वर्षभरानंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

डोंगरी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील नवरोजी हिल रोड क्रमांक ११ येथील बीआयटी चाळीजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत होता. त्यामुळे या पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात संशयास्पद पदार्थ सापडला. पोलिसांनी अमलीपदार्थ तपासणी किटद्वारे त्याची तपासणी केली असता ते चरस असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी २ किलो ८८३ ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला असून त्याची किंमत सुमारे ९१ लाख ३२ हजार रुपये आहे. चौकशीदरम्यान त्याचे नाव श्रीकांत धनू असल्याचे उघडकीस आले. तो माहीम कॉजवे दर्यासारंग सोसायटीमध्ये राहत असून डोंगरी परिसरात चरस पुरवण्यासाठी तेथे आल्याचे चौकशीत सांगितले. आरोपी व्यवसायाने चालक असून याप्रकरणी डोंगरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 57 year old man was arrested with charas worth one crore mumbai print news ssb
Show comments