मुंबई : खासगी शिकवणीबाहेर उभ्या असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला सोमवारी बोरिवली पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून बोरिवली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित मुली १६ व १७ वर्षे वयोगटातील आहेत. त्या सोमवारी खासगी शिकवणी बाहेर उभ्या होत्या. आरोपी तेथे आला व त्याने पीडित मुलींचा विनयभंग केला. त्यामुळे मुली घाबरल्या. मुलींनी आरडाओरडा केल्यामुळे जमावाने सदर व्यक्तीला पकडले. त्यापैकी एका पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांच्या कानावर घातला. त्यानुसार मुलीचे वडील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना दूरध्वनी केला. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी आले व त्यांनी आरोपी ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४ अंतर्गत विनयभंग व पोक्सो कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर ६५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी व तक्रारदार मुली एकमेकांना ओळखत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.