मुंबईतल्या वडाळा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. ६९ वर्षीय इसमाने त्याच्या ५६ वर्षांच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला आहे. या प्रकरणात वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय घडली घटना?

व्यंकटेश तणीर नावाच्या एका ६९ वर्षीय वृद्धाने त्याच्या ५६ वर्षांच्या पत्नीवर अॅसिड हल्ला केला आहे. मुंबईतल्या वडाळा भागात ही घटना घडली. ९ एप्रिलला ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपल्या पत्नीचं अफेअर सुरू आहे असा संशय या माणसाला होता. त्याच संशयातून हा अॅसिड हल्ला करण्यात आला. या प्रकरणी या वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. आयपीसीच्या कलम ३२६ बी अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हाही नोंदवला आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली आहे?

या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आरगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण ९ एप्रिलचं आहे. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. तिचं बाहेर काहीतरी अफेअर सुरू आहे असं त्याला वाटलं त्या संशयातून त्याने हा हल्ला केला. जे अॅसिड त्याने पत्नीच्या चेहऱ्यावर फेकलं ते कॉन्संट्रेटर नव्हतं तर डायलूट केलेलं होतं. त्यामुळे या महिलेचा चेहरा जळाला नाही. दोघंही घरी असताना या दोघांचं भांडण झालं. तुझं बाहेर अफेअर आहे असं हा पती त्याच्या पत्नीला म्हणाला आणि त्याने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं अशी माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि व्यंकटेश तणीरला पोलिसांनी अटक केली आहे.