मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी सकाळी मगरीचे पिल्लू आढळले. यापूर्वी या जलतरण तलावाच्या परिसरात साप, अजगर आढळले आहेत. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

दादर शिवाजी पार्क परिसरात गेल्या २० वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेचा जलतरण तलाव आहे. या तलावात पोहायला येणाऱ्यांची सदस्य संख्या मोठी आहे. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सगळे जण या जलतरण तलावात पोहोण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या चार पाच महिन्यांत या ठिकाणी वारंवार साप आढळत होते. तर ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता जलतरण तलावात दोन फूट लांबीचे मगरीचे पिल्लू आढळले. जलतरण तलाव पोहोण्यासाठी सुरू करण्याआधी नियमितपणे पाहणी करण्यात येते. तशी ती आजही करण्यात आली. त्यावेळी हे पिल्लू आढळले. हे पिल्लू वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका

हेही वाचा – नवे विमानतळ मुंबईच्या आणखी जवळ; शिवडी न्हावा शेवा पुलापासून विमानतळापर्यत थेट सागरी किनारा मार्ग

हेही वाचा – मुंबईत १०४ ते १०७ टक्के पर्जन्यमान

यापूर्वी जलतरण तलावाच्या पंप हाऊसमध्ये साप आढळला होता. त्यापूर्वीही अनेकदा जलतरण तलाव परिसरात साप आढळल्याचे येथील सभासदांनी सांगितले. त्यामुळे जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार साप आढळत असल्यामुळे जलरण तलावाच्या ठिकाणी सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करण्यात आले होते. दरम्यान, जलतरण तलावाला लागूनच एक छोटे प्राणीसंग्रहालय असून तिथून हे साप व प्राणी येत असल्याची सभासदांमध्ये चर्चा आहे.