भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या निवास्थानाबाहेर रविवारी पहाटे चोरीच्या सामानाची बॅग सापडली. या बॅगेत चलनी नाणी, दागिने आणि देवांच्या मूर्ती आहेत. अनोळखी व्यक्तीने रविवारी पहाटे घराबाहेर बॅग ठेवली होती. दरम्यान, हे साहित्य चोरीचे असल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत माटुंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास सुरक्षा रक्षकांनी लाड यांना दूरध्वनी करून निवासस्थानासमोर एक बॅग पडली असल्याची माहिती दिली. त्या बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅग होत्या. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून बॅगेची पाहणी केली. सोने, चांदी, पैसे, मूर्ती असा ऐवज बॅगेत होता.

Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!
the survey team of the administration seized gold worth 35 lakhs In Ratnagiri
रत्नागिरीत प्रशासनाच्या सर्वेक्षण पथकाने ३५ लाखांचे सोने पकडले
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
eight lakh rupees forgotten in a rickshaw returned to a female passenger In Kalyan
कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला आठ लाखाचा ऐवज महिला प्रवाशाला परत
Police seized Gutkha worth rupees 21000 at Sawal Ghat
गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करी, वाहनासह १५ लाखाचा मुद्देमाल जप्त

माझ्या घराबाहेर २४ तास पोलिस संरक्षण असते. पोलिसांना संशयित व्यक्ती दिसली होती. पोलिसांनी हटकले असता त्याने बॅग टाकून पळ काढला, अशी माहिती लाड यांनी दिली. दरम्यान, बॅगेतील ऐवज हा प्रसाद लाड राहत असलेल्या इमारतीच्या बाजूच्या इमारतीतील घरातून चोरी झालेला ऐवज असावा असा पोलिसांना संशय आहे. देवघरातील साहित्य चोरण्यात आले आल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे यापूर्वीच एक तक्रार दाखल झाली असून गुन्हा दाखल करून तपासाला सुरू आहे.