कच्छ, द्वारका, पोरबंदर, राजकोटला नुकसानीची भीती; मुंबई, पालघरमध्येही वादळी पावसाचा अंदाज

मुंबई, पुणे : Cyclone Biparjoy Gujarat Updates आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चारनंतर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकणार आहे. या वादळाचा थेट तडाखा कच्छसह देवभूमी द्वारका, पोरबंदर आणि राजकोट या भागांना बसणार असून किनारपट्टी भागांतील जवळपास ५० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अरबी समुद्रातून नेऋत्येकडे घोंघावत निघालेल्या या वादळामुळे मुंबई, ठाणे तसेच पालघर या महाराष्ट्रातील जिल्ह्यांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Muramba
फिल्मी स्टाइलने अक्षयने रमाला केले प्रपोज; गोड नात्याची नव्याने होणार सुरुवात, ‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट

बिपरजॉय चक्रीवादळ ईशान्य अरबी समुद्रातून वेगाने गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. वादळाने आपला वेग काहीसा कमी करून दिशा बदलली आहे. नेऋत्येकडे सरकत गुरुवारी सायंकाळी चार ते रात्री आठच्या दरम्यान ते कच्छ, सौराष्ट्र या भागांना धडकेल, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली.  त्या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी दीडशे किमीवर जाण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> Biparjoy Cyclone : चार वाजता बिपरजॉय धडकणार गुजरातच्या किनाऱ्याला; मुंबईवर काय होणार परिणाम?

वादळाच्या तोंडावर गुजरात सरकारने किनारपट्टी भागातील ५० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. वादळाच्या वाटेत येणाऱ्या भागांतील चार हजारांहून अधिक जाहिरात फलके हटवण्यात आली असून द्वारकातील ‘आकाशवाणी’ केंद्राचा ९० मीटर उंच मनोराही बुधवारी हटवण्यात आला. किनारपट्टी तसेच वादळाचा तडाखा बसणाऱ्या भागांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) १८ तुकडय़ा आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १२ तुकडय़ांसह रस्ते, वीज, पाणी तसेच अन्य आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या अनेक तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. 

 मुंबईसह, ठाणे, पालघर येथे वादळी वाऱ्यांची शक्यता

 मागील दोन दिवसांपासून मुंबई, नवी मुंबई येथे जोरदार वारे वाहत होते. तसेच मंगळवारी नवी मुंबई व ठाणे परिसरात रात्री  जोरदार पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी देखील नवी मुंबईत सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली .मात्र हा पूर्वमोसमी पाऊस असून तसेच बिपरजॉयचा मिश्र परिणाम असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवण्याची शक्यता असल्याने येथीलही एनडीआरएफच्या १४ तुकडय़ा तैनात आहेत. यापैकी पाच तुकडय़ा मुंबईत असतील. प्रत्येक तुकडीत ३५ ते ४० जवान असून त्यांच्याकडे वादळानंतरच्या नुकसानीत बचावकार्य करण्याची सर्व साधने असणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मोसमी पावसाला पूरक

चक्रीवादळाचा प्रभाव १८ जूनपर्यंत राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. १८ ते २१ जून दरम्यान मोसमी वारे वादळासोबत वेगाने वाटचाल करून संपूर्ण दक्षिण भाग व्यापतील. चक्रीवादळाचा प्रभाव संपताच मोसमी वाऱ्यांचा वेग आणखी वाढेल. चक्रीवादळ ओमानच्या दिशेने गेले असते तर मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला असता. मात्र, देशाच्या किनारपट्टीकडे सरकल्यामुळे देशाच्या काही भागात चांगला पाऊस होईल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.