मुंबई : दोन आठवडय़ांपासून सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पाच ते सात किमीच्या वाहनरांगा होत्या. त्यावर तातडीचा उपाय म्हणून महामार्ग पोलिसांनी मुंबईकडील मार्गिकेवर १५ मिनिटांचा ब्लॉक घेतला आणि कोंडीचा प्रश्न सोडवला.

वाहतूक कोंडीची ही समस्या मुख्यत: शनिवारी आणि रविवारी उद्भवते. गेले दोन आठवडे तर या मार्गावरील वाहतूककोडींने वाहनचालक, प्रवासी हैराण झाले होते. पोलिसांनी ही कोंडी सोडवण्यासाठी शुक्रवार-शनिवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी खंडाळा बोगद्याजवळ १५ मिनिटांचा वाहतूक ब्लॉक घेतला. ब्लॉक घेऊन मुंबईकडे येणारी मार्गिका बंद करून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सहा मार्गिका खुल्या केल्या. त्यामुळे १५ मिनिटांत सुमारे १,५०० वाहनांना मोकळा मार्ग मिळाला. या उपाययोजनेमुळे   वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
वाहतूक मंदीत मिनिटभराने सुधारणा! उपाययोजनांमुळे गती वाढल्याचा पुणे पोलिसांचा दावा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…

गेल्या शनिवारी खालापूर टोलनाक्यापासून काही अंतरावर खंडाळा बोगद्याजवळ १५ मिनिटांचे पाच ब्लॉक घेण्यात आले. मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही मार्गिका १५ मिनिटांसाठी बंद करून त्या पुण्याकडे जाण्यासाठी खुल्या करण्यात आल्या. मुंबई दिशेकडील एक मार्गिका पुण्याकडे जाण्यासाठी खुली करण्यात येते. त्यासाठी ३०० लोखंडी बॅरिकेड्सची आवश्यकता भासते. ‘एमएसआरडीसी’ने त्यांची मागणी केली आहे. या मार्गावरील नव्या मार्गिकेचे (मिसिंग लेन) काम पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची शक्यता आहे.

१५ मिनिटांत १,५०० वाहने मार्गस्थ

प्रथम या मार्गाची ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली. १० दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्वावर खंडाळा घाटात ब्लॉक घेऊन मुंबई दिशेकडील मार्गिका बंद करून पुण्यासाठी मार्गिका खुली करण्यात आली. गेल्या शनिवारीही पाच वेळा असाच १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला. १५ मिनिटांत सुमारे १,५०० वाहनांचा मार्ग मोकळा झाला, असे अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) रिवद्र सिंघल यांनी सांगितले. 

Story img Loader