मुंबई : १२ वर्षांच्या मुलीचे अश्लील चित्रीकरण करून तिच्याकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार डोंगरी परिसरात घडला असून याप्रकरणी चार मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलांची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.१२ वर्षांच्या पीडित मुलीला एप्रिल २०२३ मध्ये दोन मुलांनी व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी पीडित मुलीला धमकावून आरोपींनी तिचे कपडे काढायला सांगून चित्रीकरण केले. तसेच वेळोवेळी तिच्याकडे अश्लील छायाचित्रांची मागणी केली. हे छायाचित्र व चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोपींनी त्यानंतर पीडित मुलीकडे पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. आरोपींनी मुलीकडे २० हजार रुपये खंडणी मागितली. मुलीने या मुलांना आठ हजार रुपये दिले. पण अधिक रक्कम देण्यास तिने नकार दिला. आरोपींनी तिला धमकावत होते. अखेर हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर तिने याप्रकरणी डोंगरी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) चार अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला.