वरळी कोळीवाडा येथील समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी अखेर दादर पोलिसांनी हलगर्जीपणा मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत एकावर गुन्हा दाखल केला आहे. मृत मुलगा कार्तिक चौधरीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे दादर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा- मुंबई : भल्या पहाटे स्वच्छतेसाठी चौकीवर हजर राहणाऱ्या महिला सफाई कामगारांना दिलासा

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!

वरळी कोळीवाडा येथील समुद्रात बुडून कार्तिक चौधरी (८) व सविता पाल (१२) या दोन मुलांचा १८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. कार्तिकी पाटील (१३), आर्यन चौधरी (१०) व ओम चंद्रजित पाल (१४) हे तिघे बचावले होते. याप्रकरणी मायावती चौधरी (३०) यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी गौतम पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा- …म्हणून आज अंबानी दान करणार ३०० किलो सोनं! मुंबईत विशेष कार्यक्रमाचंही करण्यात आलं आयोजन

चौधरी यांची मुले आर्यन व कार्तिक समुद्रात खेळायला गेले होते. गौतम पाटील त्यांना पोहायला शिकवत होते. कोणत्याही संरक्षक उपकरणांचा वापर न करताच ते मुलांना पोहायला शिकवत होते. त्यानंतर पाटील पुन्हा किनाऱ्यावर आले. लाटेमुळे मुले बुडू लागली. पाटीलने केवळ त्याच्या मुलीला वाचवले. इतर मुलांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

हेही वाचा- ‘मेट्रो २ बी’ उन्नत मार्गाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; विमान उड्डाणातील संभाव्य धोके लक्षात घेऊनच बांधकामाला परवानगी

वरळी कोळीवाडा येथील समुद्रात पाच मुले बुडल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि स्थानिकांनी घटनास्थली धाव घेतली. बुडणाऱ्या पाचही मुलांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी तीन मुलांना केईएम व हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी बुडणाऱ्या कार्तिकी, आर्यन व ओम या तिघांना प्रथम समुद्रातून बाहेर काढले. मात्र कार्तिक चौधरी व सविता पाल हे दोघेजण थोडे दूर अंतरावर होते. शोध घेतला असता ते दोघेही नरिमन भाट परिसरात सापडले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Story img Loader