मुंबई: नवीन पारपत्र तयार करण्यासाठी मुलुंड येथे राहणाऱ्या एका तरुणाने वडिलांचा बनावट जन्म दाखला सादर केला असून ही बाब लक्षात आल्यानंतर मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता

हेही वाचा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?

रोहित यादव (३३) असे या तरुणाचे नाव असून तो मुलुंड परिसरात वास्तव्यास आहे. या तरुणाला नवीन पारपत्र तयार करायचे होते. यासाठी त्याने पारपत्र कार्यालयात अर्ज दाखल केला होता. पारपत्रासाठी त्याने सादर केलेली सर्व कागदपत्र तपासणीसाठी मुलुंड पोलिसांकडे पाठवण्यात आले होते. यामध्ये तरुणाच्या वडिलांचा जन्म दाखलाही होता. पोलिसांनी संबंधित संकेतस्थळावर या जन्म दाखल्याची पडताळणी केली असता तो बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against the youth who gave fake documents for passport mumbai print news ssb
Show comments