मुंबई : म्हाडाच्या भरती परिक्षेत यशस्वी झालेल्या आणखी एका उमेदवाराने अंपगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित उमेदवाराविरोधात म्हाडाकडून नुकताच खेरवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हाडाच्या विविध संवर्गातील ५६५ पदांसाठीची भरती प्रक्रिया चांगलीच वादग्रस्त ठरली आहे. सुरुवातीला या पदभरतीसाठी २०२१ मध्ये होणारी परिक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे अचानक रद्द करण्यात आली आणि त्यानंतर भरती परिक्षेतील मोठा गैरप्रकार उघड झाला. त्यानंतर २०२२ मध्ये मंडळाने संगणकीय पद्धतीने भरती परिक्षा घेतली. मात्र ही परिक्षाही वादात अडकली. या परिक्षेत तोतया उमेदवार बसल्याचा, गैरप्रकार केल्याचा आरोप झाला आणि शेवटी हा आरोप खरा सिद्ध झाला. या भरती परिक्षेत गुणवत्ता यादीतील ६० उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे चौकशीअंती सिद्ध झाले. या ६० जणांविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

हेही वाचा – INS Imphal नौदलाच्या ताफ्यात दाखल, Indian Navy च्या संचार आणि मारक क्षमतेत मोलाची भर

हेही वाचा – Bomb Threat Emails to RBI: आरबीआयसह मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, ईमेल आल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु

या गैरप्रकारानंतर म्हाडा प्राधिकरणाने भरतीतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची अत्यंत बारकाईने पडताळणी करून यशस्वी उमेदवारांना सेवेत रुजू करून घेतले. मात्र आता सेवेत रुजू केलेल्यांपैकी दोघांनी म्हाडाची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. विकास ढोले याने आपण ७० टक्के दृष्टी गमावल्याचे प्रमाणपत्र सादर केले आणि तो वरिष्ठ लिपिक म्हणून सेवेत रुजू झाला. मात्र त्याने सादर केलेल्या प्रमाणपत्राबाबत साशंकता निर्माण झाल्याने त्याची बारकाईने पडताळणी करण्यात आली. तेव्हा हे प्रणामपत्र बनावट असल्याचे उघड झाले. बुलढाण्यातील शासकीय रुग्णालयाकडून असे कोणतेच प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार ढोलेविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर त्याला सेवेतून बडतर्फही करण्यात आले आहे. ढोलेपाठोपाठ आता ज्योतिर्लिंग कोल्हापूरे याच्याविरोधातही नुकताच खेरवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कोल्हापुरे याची नियुक्ती उपअभियंतापदी झाली होती. त्याने सादर केलेले अंपगत्वाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने ढोलेनंतर कोल्हापुरेविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.