मुंबईः मणिपूरमधील घटनेविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी काढलेल्या मेणबत्ती मोर्चाप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. जमावबंदीचे आदेश धुडकावून परवानगी न घेताच मोर्चा काढल्याप्रकरणी काँग्रेस आमदार झिशान सिद्धीकी, माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री आरीफ नसीम खान, चरणजीतसिंह सपरा यांच्यासह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयाशेजारी अडवून नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मणिपूरमधील घटनेला २ महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेले, मात्र अद्याप ठोस कारवाई होत नसल्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस कार्यालयाजवळून सोमवारी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी सीएसएमटी स्थानकाजवळ हा मोर्चा अडवला. या मोर्चामध्ये वर्षा गायकवाड यांच्या समवेत माजी खासदार संजय निरूपम, माजी मंत्री नसीम खान, माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार जिशान सिद्दीकी, चरणसिंग सप्रा आदी नेत्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. परवानगीशिवाय मोर्चा काढणे व जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.