मुंबई : ८८ वर्षीय बँक खातेदाराच्या मुलाच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील सव्वाकोटी रुपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नरिमन पॉईंट येथे घडला. याप्रकरणी मरिनड्राइव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु आहे. तक्रारदार हनुमंत रामक्रिष्णा प्रसाद (८८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी २ ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा अमित हनुमंत प्रसाद याचे नरिमन पॉईंट येथील एका बँकेत भविष्य निर्वाह निधी खाते होते.

अमित विजय प्रसाद नावाच्या व्यक्तीने तोच खातेधारक असल्याचे भासवून मुलाच्या खात्यातील एक कोटी ३१ लाख ९७ हजार ६७९ रुपये इतरत्र वळते केले. गेल्या वर्षी २ ऑगस्टला हा प्रकार घडला. नुकतीच ही बाब तक्रारदाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांनी, बुधवारी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बँकेतील कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचा संशय प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करत आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Story img Loader