मुंबई : मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर चेंबूरमधील एका २४ वर्षीय तरुणाने दीड वर्षांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. तब्बल दीड वर्षांनंतर पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाची मैत्रीण आणि तिच्या वडिलांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

चेंबूरमधील पांजरापोळ परिसरात वास्तव्यास असलेल्या महेश लालवानी (२४) या तरूणाची परिसरातील एका तरुणीसोबत मैत्री होती. मात्र अचानक या दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणाने घराच्या गच्चीवर आत्महत्या केली. महेशने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मैत्रिणीला अनेक वेळा फोन केले होते. मात्र तिच्याकडून त्याला प्रतिसाद न मिळल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

हेही वाचा >>>“तर कोलांट्या उड्या मारत इकडचे…”, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची टीका

हा सर्व घटनाक्रम गच्चीवरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. याचदरम्यान मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणाची माहिती महेशच्या वडीलांना मिळाली. मात्र या भांडणाचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तरुणीच्या वडिलांनी गायब केले होते. महेशच्या वडिलांनी याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची देखल घेऊन पोलिसांनी दीड वर्षांनंतर महेशची मैत्रिण आणि तिच्या वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.