मुंबई : मोबाईल चोरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे बुधवारी पोलीस शिपायाचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी भादंवि ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दादर रेल्वे व मुंबई पोलिसांनी १० ते १२ पथके तयार केली असून अधिक तपास सुरु आहे. आरोपींनी पोलिसाच्या हातावर फटका मारून त्याचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. त्याने चोरट्यांचा पाठलाग केला असता आरोपींनी त्यांना घेरून इंजेक्शन दिले. माटुंगा व शीव रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला होता.

मृत विशाल पवार मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्रागार विभागात (एलए) कार्यरत होते. ते रविवारी (२८ एप्रिल) लोकलमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना माटुंगा व शीव स्थानकादरम्यान त्यांच्या हाताला चोरट्यांनी फटका मारला. त्यावेळी त्यांचा मोबाइल खाली पडला. तो मोबाईल घेऊन पळणाऱ्या चोरट्याचा मागे पवार यांनी धाव घेतली. यावेळी काही अंतरावर पुढे गेल्यावर त्या चोरट्याचे इतर साथीदार तेथे आले. त्यांनी पवार यांंना एक इंजेक्शन दिले. त्यानंतर पवार बेशुद्ध झाले. बारा तासानंतर सोमवारी त्यांना जाग आली असता ते कसेतरी ठाण्यातील घरी गेले. तेथे गेल्यावर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांनी स्थानिक पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिली. त्यानंतर पवार यांंची प्रकृती बिघडल्यामुळे बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

हेही वाचा – पावसाळ्यादरम्यान रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे टाळावीत, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश

हेही वाचा – गणेशोत्सव कालावधीतील रेल्वे आरक्षण शनिवारपासून सुरू होणार

याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९२, ३९४ व ३२८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण घटना दादर रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दादर पोलीस याप्रकरणी गुरुवारी भादंवि कलम ३०२ अंंतर्गत हत्येचे कलम वाढवला आहे. पवार हे मूळचे जळगाव येथील होते. ते २०१५ मध्ये पोलीस दलात रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. तीन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.