मुंबई: घराबाहेर खेळत असताना मुलुंड येथे एका सहा वर्षांच्या मुलाला उघड्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला होता. तपासानंतर याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी नऊ महिन्यानंतर महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अर्णव भंडारे असे यातील मयत मुलाचे नाव असून तो मुलुंड कॉलनी येथे राहत होता. त्याच्या घराजवळून महावितरण कंपनीची वीज वाहिनी गेली होती. ती उघडी होती. घराबाहेर खेळत असताना अर्णवचा स्पर्श वीज वाहिनीला झाला आणि त्याला विजेचा जोरदार झटका लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी तत्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पालिकेच्या अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Crime News
Crime News : “मृत्यूनंतर काय होतं?”, गुगलवर सर्च केलं आणि स्वत:वरच झाडली गोळी; ९वीत शिकणाऱ्या मुलाचे धक्कादायक कृत्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Youth beaten with knife and koyta in Rahatani Two arrested
पिंपरी : रहाटणीत तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण; दोघे अटकेत, तिघांविरोधात गुन्हा
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं
8 year girl dies due to Attack
Heart Attack : धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना कोसळली; कुठे घडली घटना?
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय
child hit by a garbage truck Ulhasnagar, Ulhasnagar,
कचऱ्याच्या ट्रकच्या धडकेत लहानग्याने गमावला पाय, उल्हासनगरातील घटना, नागरिकांत संतापाचे वातावरण

हेही वाचा – बेस्ट वाचवण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना साद

हेही वाचा – मुंबई : बेकायदा फेरीवाल्यांचा गंभीर मुद्दा चेष्टेचा विषय, सरकार-महापालिकेतील आरोपप्रत्यारोपावरून उच्च न्यायालयाचे खडेबोल

मुलुंड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी यात अपमृत्यूची नोंद केली होती. मात्र महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करून अर्णवच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी तपास केला असता महावितरण अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अधिकारी आणि चार स्थानिक रहिवासी असे एकूण सहा जणांवर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader