मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी येथे सिमेंट मिक्सर टँकरने चार दुचाकींसह एका मोटरगाडीला धडक दिली. त्या घटनेत पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना सध्या शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सकाळी आठच्या सुमारास ही घटना पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी परिसरात घडली. शीव येथून भरधाव वेगात सिमेंट मिक्सर टँकर चेंबूरच्या दिशेने जात होता. मात्र सिमेंट मिक्सर टँकर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने समोर जात असलेल्या चार दुचाकी आणि एका मारुती मोटरगाडीला धडक दिली. त्यानंतर टँकर दुभाजकाला धडकून पलटी झाला.

हेही वाचा – खुर्ची टिकविण्यासाठीच धडपड!, सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना फटकारले 

या अपघातात पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले असून सर्वांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर टँकर चालकाने पळ काढल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून चुनाभट्टी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.